१२५ कोटी भारतीयांच्या या
देशात चार टाळकी उठतात तीही सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातील, आणि असहिष्णूता, असूरक्षितता, जातीयवाद,
धार्मिक तेढ, आरक्षण अशा नसत्या विषयांवर
चकाट्या पिटत बसतात, स्वतः मोठे देशभक्त असल्याचा आव आणतात,
आपल्याला देशाची किती फिकीर आहे हे सांगण्याचा लाजीरवाणा प्रयत्न
करतात आणि आपणही नेहमीप्रमाणे अशा फुटकळ लोकांना अवास्तव महत्व देत राहतो. पण
यातून साध्य काय होते ???
जागतिक
महासत्ता म्हणून आपण जागतिक पटलावर आपला वेगळा ठसा उमटवत आहोत, जगातील अनेक देश किंबहुना सर्वच देश आपल्यासाठी पायघड्या घालत आहेत,
जगातील तीन मोठ्या कंपन्यांचे (मायक्रोसॉफ्ट, गूगल,
पेप्सी) सीईओ भारतीयच आहेत. अशाप्रकारे एकीकडे आपल्या कर्तुत्वाचा
डंका जगभरात वाजतोय आणि दुसरीकडे आपल्याच देशातील काही मूठभर लोक देशांतर्गत
वातावरण गढूळ करतात. खंत एकाच गोष्टीची वाटते की अशा घृणास्पद कृत्यांमुळे या
लोकांना फुकटची प्रसिद्धी मिळते पण देशाची प्रतिमा मलीन होते त्याचं काय ???
पुरस्कार वापसी प्रकरणानंतर भारताचे पतमानांकन कमी करण्याचा इशारा
मिळाला होता. गेली ६७ वर्षे आपण याच गोष्टी बघत आहोत आता कुठे त्यात सुधारणा होईल
असे वाटत असतानाच परत तेच प्रकार.
पण इथे कुंपणच शेत खातयं
म्हटल्यावर दोष तरी कोणाला देणार ना ... अपेक्षा एवढीच आहे की आपण सर्वांनी मिळून
या देशाला वेगळ्या उंचीवर पोहोचवण्यासाठी झटले पाहिजे. असे ''इडियट" या प्रयत्नात बाधा आणत राहतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून
आपण आपले काम चालूच ठेवायला हवे.
AN ENDLESS JOURNEY TOWARDS AN ''
INCREDIBLE INDIA ''.
- राम खुस्पे
